रावडेवाडीतील पराग कारखान्यात चोरी | पुढारी

रावडेवाडीतील पराग कारखान्यात चोरी

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा: पराग साखर कारखान्यातील कारखान्याचे, तसेच आतील वीज निर्मिती प्रकल्पाचे कंपाउंड तोडून न्यूट्रल ग्राउंडिग अर्थिंगसाठी असलेल्या कॉपर पट्ट्यांची चोरी झाली आहे. पराग कारखाना येथे वीजनिर्माती प्रकल्प सन 2018 पासुन सुरू आहे. त्याकरिता कोजन ट्रान्सफॉर्मर (स्विच यार्ड) बसविलेला आहे. या ट्रान्सफॉर्मरची अर्थिंग पास होण्यासाठी कॉपर पट्ट्या बसवलेल्या होत्या.

मंगळवारी (दि. 13) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास कारखान्याचे सुरक्षा अधिकारी रत्नकांत कुरवडे व लेबर ऑफिसर किशोर नेवसे राउंड मारत असताना वीज निर्मिती प्रकल्पाचे व कारखान्याचे बाजूने असलेले तार कम्पाउंड कट झालेले दिसले. त्यामुळे त्यांनी विदयुत अभियंता गोरक्षनाथ खतोडे यांना कळविले. त्यांनी पाहणी केल्यानंतर वीज निर्मिती प्रकल्पाचे कोजन ट्रान्सफॉर्मर (स्विच यार्ड) चेक केला असता, ट्रान्सफॉर्मर ते आरपिटचेदरम्यान न्यूट्रल पॉईंट अर्थ करण्यासाठी बसवलेल्या न्यूट्रल ग्राउंडिग कॉपरच्या दोन पट्ट्या दिसून आल्या नाहीत. त्या अज्ञाताने चोरल्याचे या वेळी स्पष्ट झाले. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

 

Back to top button