पुणे : अंघोळ करतानाचे फोटो काढून ब्लॅकमेलिंग | पुढारी

पुणे : अंघोळ करतानाचे फोटो काढून ब्लॅकमेलिंग

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अंघोळ करत असलेल्या एका महिलेचे फोटो काढून त्या फोटोच्या आधारे तिला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तिघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. अमन शेख (वय 23), त्याचे वडील व आई (रा. उत्कर्षनगर, बारामती) अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 30 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमन शेख आणि त्याच्या आई-वडिलांनी बेकायदा फिर्यादींच्या घरात प्रवेश केला. या वेळी महिलेला शिवीगाळ करून तिचे अंघोळ करत असतानाचे चोरून काढलेले व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला आम्ही सांगेन तसेच वागावे लागेल म्हणत मारहाण करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार 12 सप्टेंबर रोजी चार वाजण्याच्या सुमारास घडला. पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

लग्नासाठी लागत होता तगादा
गुन्हा दाखल करण्यात आलेला अमन याने फिर्यादी महिलेला लग्न झालेले असतानाही तिने लग्नासाठी तयार व्हावे, असा तगादा लावला होता. त्याने तिच्या सासरीही असा प्रकार केल्याने ती तिच्या माहेरी येऊन राहत असताना त्याने तेथे येऊन तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तसेच काढलेले व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Back to top button