वखवखलेल्या नजरा करताहेत घात; पुणे शहरात विनयभंगाच्या तीन घटना

वखवखलेल्या नजरा करताहेत घात; पुणे शहरात विनयभंगाच्या तीन घटना
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात विनयभंगाच्या घटना घडल्या असून, त्यातील एक घटना येरवडा, दोन घटना कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. पहिल्या घटनेत 19 वर्षीय तरुणीशी ओळख वाढवून तिच्याशी मैत्री करून तिला शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी राजेश नावाच्या एकावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब—ुवारी ते सप्टेंबरदरम्यान घडला. याप्रकरणी संबंधित तरुणीने आरोपीविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुसर्‍या गुन्ह्यात विवाहित महिला काम करत असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला घेऊन जाऊन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच संबंधित आरोपीने त्याच्यासोबत लग्न न केल्यास तिच्या सोबतचे चॅट, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन व्हिडिओ पीडित महिलेच्या पतीला पाठवून तिची बदनामी केली. याप्रकरणी अक्षय सपकाळ (रा. टिळेकरनगर, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर याबाबत एका 34 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार टिळेकरनगरमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये घडला.

तिसर्‍या घटनेत चालकाने गाडीला रस्ता न दिल्याच्या कारणावरून दुसर्‍या कारचालकाने त्याला मारहाण केली. त्याला मारहाण करत असताना कारमध्ये बसलेल्या तरुणीने चालकाला कशाला मारहाण केली, अशी विचारणा केली असता तिलाही मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार एनआयबीएम रोडवरील वाटिका सोसायटी येथे घडली.

मित्राकडून लैंगिक संबंधांची मागणी
मैत्रिणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राजेश गौतम सूर्यवंशी (वय 32, रा. गणेशनगर, येरवडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गेल्या 12 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घटला. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

गेल्या आठ महिन्यांपूर्वी आरोपीने फिर्यादीशी मैत्री केली होती. त्याने तिच्या शरीराला स्पर्श करून तिच्याकडे लैंगिक संबंधाची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणातील पीडितेने राजेश याच्या भीतीपोटी विष पिले असून, ती सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. राजेश याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली आहे.

महाविद्यालयीन तरुणाला मारहाण
मुलीच्या छेडछाडीवरून महाविद्यालयीन तरुणाला एकाने मारहाण केल्याची घटना घडली. तर, त्याच्या मोबाईलचे नुकसान करून तुला सोडणार नाही, अशी धमकीही दिली. याप्रकरणी 18 वर्षीय तरुणाने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी एका नामांकित महाविद्यालयाच्या परिसरात घडला आहे. दोघे एकाच महाविद्यालयात आहेत. तक्रारदार तरुण मुलीची छेड काढत आहे, असा संशय होता. त्यावरून हा वाद झाला आहे. पुढील तपास लष्कर पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news