स्मशानभूमी अभावी रस्त्यावरच अंत्यविधी; सिंहगड परिसरातील आतकरवाडी येथील घटना | पुढारी

स्मशानभूमी अभावी रस्त्यावरच अंत्यविधी; सिंहगड परिसरातील आतकरवाडी येथील घटना

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: स्मशानभूमी नसल्याने सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या घेरा सिंहगडच्या आतकरवाडी येथील एका ज्येष्ठ नागरिकावर रविवारी पावसात रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. यामुळे कष्टकरी मावळ्यांच्या वेदना मृत्यूनंतरही संपत नसल्याचा प्रत्यय आला! पार्थिवाचे होणारे हाल पाहून शोकाकुल नातेवाइकांनी हंबरडा फोडला.

आतकरवाडी येथे रविवारी सकाळी आदिवासी समाजाचे शेतकरी चंद्रकांत पढेर (वय 65) यांचे निधन झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने मुख्य डोणजे-आतकरवाडी रस्त्यावर आणण्यात आले. रविवारच्या सुटीमुळे सिंहगडावर पर्यटकांची गर्दी होती. त्यामुळे वाहतुकीसाठी एक बाजू मोकळी ठेवण्यात आली. त्यानंतर रस्त्याच्या एक बाजूला पढेर यांचे पार्थिव ठेवून त्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली जाऊ लागली.

मात्र, धो-धो कोसळणार्‍या पावसामुळे पार्थिवावरील अग्नी विझण्याची शक्यता होती. त्यामुळे पार्थिवावर गोवर्‍या रचून त्यावर चार लोखंडी पत्रे ठेवण्यात आले. मात्र, आगीच्या ज्वालांनी पत्रे जळून खाक झाले. पावसामुळे गोवर्‍या भिजल्या. त्यामुळे चिता विझल्याने पुन्हा डिझेल ओतून पार्थिवाला अग्नी देण्याची वेळ नातेवाईक व ग्रामस्थांवर आली. पावसाने पुन्हा हाहाकार उडाल्याने चिता विझू नये, यासाठी दुसर्‍यांदा लोखंडी पत्रे ठेवण्यात आले. तब्बल अडीच तास हा अंत्यविधी सुरू होता. मयत चंद्रकांत पढेर यांना मुलबाळ नाही. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, पुतणे, असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांचे पथक घटनास्थळी रात्री दाखल झाले.

स्मशानभूमीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
आतकरवाडी येथे स्मशानभूमी नसल्याने वर्षानुवर्षे मुख्य डोणजे-आतकरवाडी रस्त्यावर अंत्यविधी केले जात आहेत. पावसाळ्यात अंत्यविधी करताना मोठ्या हलाखीला तोंड द्यावे लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध होत नाही, असे चित्र पुढे आले आहे. मात्र, त्यावर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली

Back to top button