विधी अभ्यासक्रमाचा निकाल नियमानुसारच; पुणे विद्यापीठाचे स्पष्टीकरण | पुढारी

विधी अभ्यासक्रमाचा निकाल नियमानुसारच; पुणे विद्यापीठाचे स्पष्टीकरण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम सत्र परीक्षेतील विधी शाखेचा तीन वर्षे अभ्यासक्रमाचा निकाल नियमानुसारच जाहीर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अंतिम सत्र परीक्षेतील विधी शाखेचा तीन वर्षे अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये साधारण पाचशेहून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत.

त्यामुळे निकालावरून संभ म होता. परंतु, संबंधित निकाल प्रचलित स्केल डाऊन पद्धतीने नियमानुसारच जाहीर करण्यात आला असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे.  परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा विभागामध्ये निकाल तयार करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया ही संबंधित विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांकरिता निश्चित केलेले नियम, शिखर संस्थांची धोरणे, सामाजिक व शैक्षणिक उद्दिष्टे व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या नियमावलीप्रमाणेच करण्यात येते.

त्यासाठी शैक्षणिक व परीक्षांचा आराखडा यामधील तरतुदींचे पालन केले जाते. शैक्षणिक वर्ष 2017 पासून विधी विद्याशाखेतील तीन व पाच वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी उत्तीर्णता निकष (स्टँडर्ड ऑफ पासिंग) नुसार स्केल डाउन प्रक्रियेचा अवलंब करून निकाल जाहीर केले जात आहेत.

 

Back to top button