पुणे : चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतरचा वाहतूक आराखडा तयार | पुढारी

पुणे : चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतरचा वाहतूक आराखडा तयार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चांदणी चौकातील जुना पूल पाडून त्या ठिकाणी उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. पूल पाडल्यानंतर होणार्‍या वाहतुकीचा प्रारूप आराखडा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) तयार केला आहे.  हा आराखडा मान्यतेसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये मुळशीकडून येऊन बावधन, कोथरूड, वारजेकडे जाणे आणि हिंजवडी, मुंबईच्या दिशेला जाणे शक्य होणार आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पांतर्गत येथील जुना अरुंद पूल पाडून, त्या ठिकाणी 115 मीटर लांब आणि 36 मीटर रुंद नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या आठवड्यात जुना पूल पाडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. तो पूल पाडल्यानंतर वाहतुकीची व्यवस्था कशी असेल, त्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.

चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यानंतर वाहतूक व्यवस्थेचा एनएचएआयने प्रारूप आराखडा तयार केला आहे. तो मान्यतेसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाठवला आहे. त्यांच्याकडून यावर काही हरकती, सूचना असल्यास त्या स्वीकारून हा आराखडा अंतिम केला जाईल.
                                                      – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

Back to top button