पुण्यात शहरी गरीब योजनेच्या कार्डसाठी 3200 अर्ज

पुण्यात शहरी गरीब योजनेच्या कार्डसाठी 3200 अर्ज
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील गोरगरीब नागरिकांना वरदान ठरत असलेल्या शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्यासाठी आतापर्यंत 3278 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यातील 2397 अर्ज मंजूर करण्यात आले असून, 864 अर्ज प्रलंबित आहेत. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली 1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून लवकरच 1 लाख 60 हजार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.

शहरातील आथिर्क दुर्बल घटकांसाठी आणि ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे, अशा नागरिकांसाठी महापालिकेने 2011 पासून शहरी गरीब योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत संबंधित कुटुंबातील व्यक्तींना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी एक लाखापर्यंत आर्थिक मदत मिळते. तसेच कॅन्सर आजाराच्या रुग्णांस दोन लाख रुपये मदत मिळते. या योजनेमध्ये आतापर्यंत एक लाखांहून अधिक नागरिकांना सुमारे 400 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत झाली आहे.

या योजनेचा गैरफायदा घेणार्‍यांना आळा घालण्यासाठी महापालिकेने कार्ड देण्याची ऑनलाईन प्रक्रिया हाती घेतली आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आतापर्यंत 3278 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यातील 2397 अर्ज मंजूर करण्यात आले असून, 864 अर्ज प्रलंबित आहेत. दरम्यान, ज्या वेळेस ही योजना सुरू करण्यात आली, त्यावेळचे नागरिकांचे उत्पन्न आणि सध्याचे उत्पन्न यामध्ये मोठा बदल झाला आहे. एकीकडे नागरिकांचे उत्पन्नाचे मार्ग वाढले आहेत, तर दुसरीकडे महागाई वाढली आहे. त्यामुळे कागदावर उत्पन्न जास्त दिसते. मात्र, महागाईमुळे हाती काहीच राहत नाही.

या बाबींचा विचार करून शहरी गरीब योजनेचा लाभ घेण्यासाठी निश्चित करण्यात आलेली वार्षिक उत्पन्नाची 1 लाखाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार योजनांचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा लवकरच वाढवून 1 लाख 60 हजार रुपये करण्यात येणार आहे. शिवाय, नवीन कार्ड काढण्यासाठी महापालिकेतील टेबल संख्या वाढवण्यात येणार असल्याचेही बिनवडे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news