शिरूर : फसवणूक करणार्‍या दाम्पत्यावर गुन्हा दाखल | पुढारी

शिरूर : फसवणूक करणार्‍या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

शिरूर; पुढारी वृत्तसेवा: उसने पैसे घेतलेले व दागिने विश्वासघाताने घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दांपत्यावर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिषा विजय लोखंडे व विजय लोखंडे (दोघेही रा. घोटवी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माया सुदेश म्हस्के (वय 36, रा. करंजुलेनगर, शिरूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादित म्हटले आहे, की सन 2020 रोजी लोखंडे दांपत्य यांनी 9 लाख 80 हजार रुपये किमतीचे 96 ग्रॅम वजनाचे दागिने महिलांना वेगवेगळी कारणे फसवणुकीने घेऊन गेले.

त्याचबरोबर हातउसने पैसे द्या किंवा तुमचेकडील दागिने गहाण ठेवण्यासाठी द्या, असे म्हणून फिर्यादी म्हस्के यांचाकडून 54 ग्रॅम वजनाचे दागिने आठ दिवसांत परत देते, असा विश्वास संपादन करून विश्वासघाताने आर्थिक फसवणूक केली. शिरूरमधील इतर महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचेकडून विश्वासाने हातउसने पैसे घेऊन ते आठ दिवसांत परत करतो, असे म्हणून 9 लाख 80 हजार रुपये व 42 ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन गेले आहेत. यासंदर्भात तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत आहेत.

Back to top button