इंदापुरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

इंदापुरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: इंदापूर शहरानजीक अकलूज रोड बायपासलगत कांदा मार्केटच्या समोर राहणार्‍या एका अठ्ठावीस वर्षीय युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.10) घडली. संजय दशरथ मोरे (वय 28) असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. दरम्यान मयताच्या नातेवाईकांनी सदर आत्महत्या ही इंदापूर पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याच्या दबावातून व मानसिक त्रासातून केल्याचा आरोप केला आहे.

सदर पोलिस कर्मचार्‍यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नातेवाईकांनी इंदापूर ठाण्यासमोर ठिय्या मांडला. तसेच रुग्णवाहिकेत मृतदेह ठाण्यात आणल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोषीवर गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिल्यानंतर मृतदेह पोलिस ठाण्यातून बाहेर नेण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

Back to top button