पुणे : पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर: टिळक चौकातील घटना | पुढारी

पुणे : पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर: टिळक चौकातील घटना

पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीचा रथ पुढे जात नसल्याने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता थेट रस्त्यावर उतरले आहेत. रात्री ८.३० वाजल्यापासून भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचे नवनाथ (अचानक) मित्र मंडळ हे कुमठेकर रोड वर थांबले होते.

वारंवार अनेक मंडळाने पोलिसांना आणि महापालिका प्रशासनाला सांगून सुद्धा मंडळ त्यांचा गाडा पुढे घ्यायला तयार नव्हते. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता स्वतः यांनी पोलिस अधिकाऱ्यांना घेऊन दीपक पोटे यांच्या मंडळाला पुढे जाण्यास सूचना दिल्या.

यासह पोलिस आयुक्त यांनी महापालिकेच्या मंचावर असलेल्या काही कार्यकर्त्यांना हाकलले यामुळे काही काळ अलका टॉकीज चौकात तणाव निर्माण झाला होता

Back to top button