पारगाव : काटवान वस्ती शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले | पुढारी

पारगाव : काटवान वस्ती शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: वळती येथिल काटवान वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये बुधवारी (दि. ७) रात्री पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी साचले. या शाळेच्या वर्गखोल्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पालक आणि शिक्षकांनी केली आहे. काटवानवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता चौथीपर्यंत आहे. येथे दोन वर्गखोल्या आहेत.

शाळेच्या या दोन्हीही वर्गखोल्यांची सध्या अत्यंत दुरावस्था झाली आहे. वर्गखोल्यांवरिल पश्चिम दिशेकडील मुंढोरी पावसाने पडली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी आत शिरले, तसेच पत्रा-कौलांमधून पाणी खाली साचले. कौलेदेखिल फुटली आहेत. भिंतींना तडे गेले आहेत. गुरुवारी (दि. ८) सकाळी शाळेत मुले आल्यानंतर मुले, शिक्षक, पालकांनी वर्ग खोल्यांमधील पाणी बाहेर काढले. शाळेच्या वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी शिक्षक, पालकांनी केली आहे.

फोटो : जिल्हा परिषद प्राथमिक काटवान वस्ती शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. दुसर्‍या छायाचित्रात शाळेच्या व्हरांड्याची मुंढोरी पडली. (छाया : किशोर खुडे)

Back to top button