पिंपरी : निलंबित पोलिस असल्याचे सांगून तरुणाला मारहाण | पुढारी

पिंपरी : निलंबित पोलिस असल्याचे सांगून तरुणाला मारहाण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : निलंबित पोलिस असल्याचे सांगून एकाने तरुणाला मारहाण केली. हा प्रकार जानेवारी ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत नक्षत्र पीजी, नारायणनगर, हिंजवडी येथे घडला. साजिद मन्सूर पेंढारी (23, रा. नक्षत्र पीजी, नारायणनगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल नामदेव राठोड (29, रा. परभणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिंजवडी येथे एकवीरा पेईंग गेस्ट हॉस्टेल चालवितात. दरम्यान, तेथे राहत असलेला मुलगा विकी चव्हाण याची फिर्यादी सोबत ओळख झाली.

विकी याने फिर्यादी यांना त्याचा मामा आरोपी राहुल राठोड याच्यासोबत ओळख करून दिली. दरम्यान, जानेवारी 2022 ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत आरोपीने फिर्यादी यांना मी पोलिस खात्यामध्ये सहाय्यक पोलिस फौजदार पदावर नोकरी करत होतो. मी पोलिस स्टेशन हाऊस इन्चार्ज होतो. मला काही कारणाने पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले. त्यामुळे मी हिंजवडी येथे नोकरीसाठी आलो आहे, असे खोटे सांगितले. त्यानंतर विनाकारण भांडण काढून फिर्यादी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच, फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांची पिंजर्‍याची गाडी बोलावतो. तुला जेलमध्ये टाकतो, असे बोलून भीती दाखवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button