पुणे : मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा | पुढारी

पुणे : मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लोहगाव येथील राखपसरे वस्ती येथे बेकायदा चालणार्‍या मटक्याच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकत बारा जणांवर गुन्हा दाखल केला. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोहगाव येथील राखपसरे वस्तीतील एका शेडमध्ये मटक्याचा अड्डा असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागला मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने अड्ड्यावर छापा टाकून 12 जणांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

12 जणांना पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक श्रीधर खडके, अंमलदार अजय राणे, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अंगठी घेऊन पैसे न देता पोबारा
विश्रांतवाडी येथील आभूषण नावाच्या ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन अर्ध्या ग्रॅमची अंगठी विकत घेऊन त्याचे बिल न देता 66 हजारांची अंगठी चोरी करून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेंद्र रूपावत (वय 53, रा. विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 3 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घडला.

 

Back to top button