पिंपरी : पावसाची जोरदार हजेरी | पुढारी

पिंपरी : पावसाची जोरदार हजेरी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी चिंचवड शहर परिसरात बुधवारी (दि.7) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या चार, पाच दिवसांपासून वातावरणात मोठा उकाडा जाणवत होता. सकाळी काहीवेळ कडाक्याचे उन पडल्यामुळे हवेत उकाडा वाढला होता. दुपारी साधारण दोन वाजल्यानंतर वातावरणात बदल होऊन पावसाचे वातावरण तयार झाले होते.

काही वेळानंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. सायंकाळी सातनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे भाजी विक्रेते, पथारीवाले यांचे हाल झाले. तसेच रात्री गणेशोत्सवाचे देखावे पहायला जाणार्‍या नागरिकांचा यामुळे हिरमोड झाला.

Back to top button