मुलखेडच्या तरुणाचा सूस येथे अपघाती मृत्यू | पुढारी

मुलखेडच्या तरुणाचा सूस येथे अपघाती मृत्यू

नांदे; पुढारी वृत्तसेवा: सूस (मुळशी) येथे दुचाकी व चारचाकीत झालेल्या अपघातात शुभम दिनकर तापकीर (वय 25) याचा मृत्यू झाला, तर आशुतोष बाळू तापकीर (वय 25) हा गंभीर जखमी झाला. मंगळवारी (दि.6) सायंकाळी हे दोन तरुण दुचाकीवरून घरी जात असताना समोरून आलेल्या वॅगनार या चारचाकी गाडीने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

धडकेत शुभम व आशुतोष यांना गंभीर दुखापत झाली. दोघांना तातडीने सिम्बायोसिस रुग्णालयात हलवले, मात्र शुभमचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आशुतोष उपचार घेत आहे. शुभम हा मुलखेड गावातील एक चांगला अभियंता होता. चारचाकीच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे.

Back to top button