सरपंचपद : 103 जणांची माघार; ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदासाठीचे 234 अर्ज घेतले मागे | पुढारी

सरपंचपद : 103 जणांची माघार; ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदासाठीचे 234 अर्ज घेतले मागे

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींच्या 485 सदस्यपदांसाठी 930 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 234 जणांनी माघार घेतली. तर, 61 सरपंचपदांसाठी 315 पैकी 103 जणांनी माघार घेतली. ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड थेट मतदारांतून होत असून, जिल्ह्यातील 61 जागांसाठी 315 उमेदवारांनी अर्ज केला. अर्ज माघारीचा मंगळवारी हा शेवटचा दिवस होता.

103 जणांनी अर्ज माघारी घेतले. आता भोरमधील दोन जागांसाठी 6, खेडमध्ये 5 जागांसाठी 10, आंबेगावमध्ये 18 जागांसाठी 66 आणि जुन्नर तालुक्यातील 36 सरपंचपदासाठी 128 उमेदवार रिंगणात आहेत. सदस्यपदांच्या 485 जागांसाठी निवडणूक होत असून, 921 अर्ज वैध ठरली होती. त्यातील 234 जणांनी अर्ज मागे घेतली.

त्यामुळे आता भोर तालुक्यातील 18 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. खेडमधील 35 सदस्यांसाठी 50, आंबेगाव तालुक्यातील 144 जागांसाठी 203 आणि जुन्नरमधील 288 जागांसाठी 398 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.

दोन ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, दुसर्‍या दिवशी 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बार्पे बुद्रुक आणि चांदखोेड (ता. मुळशी) दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Back to top button