मंचर : सामान्य ज्ञानात भर पडतील अशा गोष्टी शिकवा: माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा शिक्षकांना सल्ला | पुढारी

मंचर : सामान्य ज्ञानात भर पडतील अशा गोष्टी शिकवा: माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा शिक्षकांना सल्ला

मंचर; पुढारी वृत्तसेवा: सध्या सर्वत्र स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे शिक्षकांनी नियमित अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडतील अशा गोष्टी शिकवल्या पाहिजेत, असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. मंचर (ता. आंबेगाव) येथील समर्थ भारत परिवार व आंबेगाव तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने व—तस्थ पुरस्कार आणि दहावी-बारावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात झाला. या वेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे संचालक अजय घुले, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, अशोक वळसे पाटील, सुनील वळसे पाटील, समीर पठाण, अतुल साबळे, सरपंच उत्तम टाव्हरे, मनोज तळेकर, शरद पोखरकर, विलास भोर, समीर गोरडे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी हितगुज करताना वळसे-पाटील म्हणाले की, जागतिकस्तरावर घडणार्‍या घटना आणि भविष्यकाळातील संकटांचा सामना कसा करायचा, याची जाणीव करून दिली पाहिजे. आपल्या देशाची लोकसंख्या आज 130 कोटींच्या आसपास आहे. यात युवकांची संख्या 60 टक्क्यांपर्यंत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. युवावर्गाची ही मोठी संख्या असताना प्रत्येक तरुणाला नोकरी मिळेलच असे नाही. संधी मर्यादित आणि उपलब्धता जास्त असल्यामुळे आपले लक्ष्य गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगळा विचार केला पाहिजे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन पाटील म्हणाले, गुण मिळवणे ही चांगली बाब आहे. ीीपण, त्याचबरोबर ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे.

Back to top button