पुणे : अश्लील फोटो बनवून डॉक्टर तरुणीची बदनामी | पुढारी

पुणे : अश्लील फोटो बनवून डॉक्टर तरुणीची बदनामी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कोरोना काळात सामाजिक कार्य करताना झालेल्या ओळखीतून डॉक्टर तरुणीच्या आधार कार्डच्या आधारे अश्लील फोटो बनवून ते तिच्या आईच्या इन्स्ट्राग्राम आयडीवर पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी बारामतीच्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश ज्ञानदेव निंबाळकर (रा. मोतानगर, सूर्यनगरी, बारामती), असे गुन्हा दाखल केल्याचे नाव आहे. याबाबत तरुणीच्या आईने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची 33 वर्षीय मुलगी डॉक्टर आहे.

कोरोना काळात काम करीत असताना स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणार्‍या निंबाळकर बरोबर कामानिमित्त संबंधित तरुणीची ओळख झाली. या तरुणीने त्याला त्याच्या कामासाठी तिचा लॅपटॉप दिला होता. त्याच लॅपटॉपमध्ये तरुणीचा सर्व महत्त्वाचा डेटा, फेसबुक, इंस्ट्राग्राम अकाउंट होते.

ही माहिती निंबाळकर याने त्याच्याकडे घेऊन आधाराकार्डवरून तिचे अश्लील फोटो तयार केले. त्यानंतर ते तिच्या आईच्या अकाउंटला पाठविले. या फोटोमुळे तरुणीची बदनामी झाल्याने निंबाळकर याच्यावर आयटी अ‍ॅक्ट, विनयभंग, तसेच बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा ऑक्टोबर 2020 ते ऑगस्ट 2022 दरम्यान घडल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले.

Back to top button