पिंपळे गुरव : घाटावर गणेश विसर्जन बंद, नदी प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती संकलन करण्याचे पालिकेचे आवाहन | पुढारी

पिंपळे गुरव : घाटावर गणेश विसर्जन बंद, नदी प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती संकलन करण्याचे पालिकेचे आवाहन

पिंपळे गुरव, पुढारी वृत्तसेवा: सात आणि दहा दिवसाच्या घरगुती आणि मंडळाच्या गणपती मूर्तींचे विसर्जन करण्याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना नदी प्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्तींचे संकलन केंद्रावर संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ड क्षेत्रीय कार्यक्षेत्र अंतर्गत पिंपळे गुरव परिसरातील घाटावरील सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन बंद केले असून नागरिकांनी शक्यतो गणेश विसर्जन आपल्या घरीच करावयाचे आहे. ज्या, नागरिकांना गणेश मूर्ती घरी विसर्जन करणे शक्य नसेल त्यांनी नजिक असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गणेश मुर्ती संकलन केंद्रावर गणेशमुर्ती आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सात आणि दहा दिवसांच्या पूजा निर्माल्य जमा करण्याची सोय संकलन केंद्रावर करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

असे असेल पिंपळे गुरव भागातील गणेशमूर्ती संकलन केंद्र

रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव
तुळजा भवानी मंदिर पवना घाट, पिंपळे गुरव
म.न.पा. शाळा पिंपळे गुरव.
सृष्टी चौक बुद्ध विहार घाट, पिंपळे गुरव
डॉमोनेज पिझ्झा काशीद पार्क, पिंपळे गुरव.

Back to top button