आळेफाटा जवळ तरुणीवर अत्याचार, दोन नराधमांना अटक | पुढारी

आळेफाटा जवळ तरुणीवर अत्याचार, दोन नराधमांना अटक

आळेफाटा ; पुढारी वृत्तसेवा : आळेफाटा (ता. जुन्नर जि. पुणे) पोलीस ठाणे हद्दीत एका २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्या नराधमांना अटक केली. अशोक हरिभाऊ बनोटे व संदीप भिवसेन सूर्यवंशी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात पीडित मुलगी एकटीच घरी होती. याच संधीचा फायदा घेवून आरोपींनी घरात प्रवेश केला. घरात घुसून त्या दोघाआरोपींनी पीडित तरुणीला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोंपीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अशोक हरिभाऊ बनोटे (वय- ४५, रा. श्रीरामपूर, जि अहंमदनगर) व संदीप भिवसेन सूर्यवंशी (वय- ५० रा. बोरी बुद्रुक ता. जुन्नर जि पुणे) या दोन्ही नराधमांना मोठ्या शिताफीने तात्काळ अटक केली. या दोन्ही नराधमांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

Back to top button