पुणे : ‘आरे’च्या मदतीला धावले दूध संघ

पुणे : ‘आरे’च्या मदतीला धावले दूध संघ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्य सरकारचा 'आरे ब्रॅंड' कायम राहावा आणि ब्रॅंड'चा दूध पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी राज्यातील काही सहकारी दूध संघ आणि खासगी दूध ब्रॅंड'धारकांनी 'आरे'ला दररोज एक टँकर दूधपुरवठा करण्यास संमती दिली आहे. त्यामुळे शासनाच्या मुंबई शहरासाठीच्या दूध पुरवठ्यातील अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या 'आरे ब्रॅंड''चा मुंबई शहरात दररोज सुमारे 9 ते 10 हजार लिटर इतका दूध पुरवठा रुग्णालयांसह काही महत्त्वाच्या ठिकाणी सुरू आहे.

सध्या दुधाचे दर तेजीत असून, खरेदीसाठी जादा दर देऊन चढाओढ सुरू आहे. त्यामुळे शासनाला मागणीच्या तुलनेत दुधाचा पुरवठा कमी होत आहे. त्याचा परिणाम दूध पुरवठ्यावर होत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त हणुमंत तुमोड यांनी सोमवारी (दि.5) राज्यातील काही महत्त्वाचे सहकारी दूध संघ व खासगी ब्रॅंड'धारकांची ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये आयुक्तांनी मांडलेल्या भूमिकेला सर्वांनी सहमती दर्शवित दूध पुरवठा करण्याचे मान्य केले आहे.

बैठकीनंतर प्रकाश कुतवळ म्हणाले, 'दूध व्यवसायातील अत्यंत अडचणीच्या काळात राज्य सरकारने दूध खरेदी करताना प्रति लिटरला 3 ते 5 रुपयांचे अनुदान सर्वांना दिले आहे. सध्या शासनाच्या आरे ब्रॅंड'ला दूधपुरवठा वाढत्या दूध दरात कमी होत आहे. त्यांना पुरवठा करण्याची भूमिका बैठकीत मांडली गेली असता ज्यांचा 50 हजार लिटरहून अधिक दूध संकलन आहे, अशा खासगी व सहकारी दूध संघाने दररोज दहा हजार लिटरचा एक टँकर शासनाच्या नियोजनानुसार देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

दररोज 10 हजार लिटर दुधाचा पुरवठा करणार

मुंबई शहरासाठी शासनाच्या आरे ब्रॅंड'चे दूध संकलन चिपळून येथून होत आहे. मुंबईत आरे ब्रॅंड' दूधाची रोजची 9 हजार लिटरइतकी विक्री ही प्रामुख्याने कारागृहे, रुग्णालये, राजभवनासह स्टॉलधारकांना होत आहे. सध्या दूधपुरवठा कमी होत असून सोमवारच्या संयुक्त बैठकीत खासगी व सहकारी दूध संघाने दररोज एक टँकर दूधपुरवठा करण्याचे मान्य केले असून शासन दरानेच ही दूध खरेदी होईल.

                        – हनुमंत तुमोड, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त, वरळी, मुंबई.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news