कर्नाटक येथील चोर पुण्यात सक्रिय | पुढारी

कर्नाटक येथील चोर पुण्यात सक्रिय

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नुकतेच सिंहगडरोड पोलिसांनी कर्नाटक येथील आंतराज्यीय टोळीतील तिघांना 84 मोबाईलसह पकडले होते. गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने देखील पुण्यात मोबाईलची चोरी करणार्‍या कर्नाटक येथील मोबाईल चोरट्याला जेरबंद केले आहे. कनार्टक येथील चोरटे पुण्यात सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. प्रेमकुमार ब्रह्मय्या (ग्रीनपार्क, एलबी नगर, जि. रंगारेड्डी, हैदराबाद) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, अंमलदार शंकर नेवसे, रेश्मा उकरंडे, मोहसीन शेख, प्रमोद कोकणे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी मोहसीन शेख आणि प्रमोद कोकणे यांना संशयित मोबाईल चोरटा पुणे स्टेशन येथील प्रवाशांचे मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजले.

त्या आधारे प्रेमकुमार याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Back to top button