

बारामती : बारामती शहर आणि उपनगरात रविवारी (दि.4) दुपारी दोन वाजता मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे एक तास झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. रविवारी सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. सायंकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती.
मात्र, दुपारी जोरदार पाऊस बरसला. गणेशोत्सवात तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात सलग पाऊस सुरू आहे. पावसाने रविवारी शहर, औद्योगिक परिसर, उपनगर तसेच तांदूळवाडी, जळोची, कसबा, फलटण रस्ता आदी भागात हजेरी लावली. रविवारी गौरीनिमित्त खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती, पावसाने त्यांची धांदल उडाली.