कालठण : उजनी पाणलोट क्षेत्रात हुमनीचा प्रादुर्भाव; ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल | पुढारी

कालठण : उजनी पाणलोट क्षेत्रात हुमनीचा प्रादुर्भाव; ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल

कालठण; पुढारी वृत्तसेवा: उजनी धरण पाणलोट क्षेत्रात हुमणी किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने उसाचे पीक अडचणीत आले आहे. हुमणीने उसाची मुळे खाल्ल्याने शेकडो हेक्टरवरील ऊस जळू लागला आहे. अनेकांचा ऊस उन्मळून पडत आहे. हुमणीवर कीटकनाशकांच्या फवारणीचाही विशेष परिणाम होत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

हुमणी जमिनीत असल्याने दिसत नाही. पिके पिवळी पडायला लागल्यावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते. ही कीड मुळे खाते, त्यामुळे ऊस उन्मळून पडतो. तोडणीयोग्य उसावर किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. उसाला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकरी पिकाची जोपासना करीत आहे. असे असताना हुमनीमुळे त्याचे गणित बिघडण्याची शक्यता निमार्ण झाली आहे.

उजनी धरण जरी भरले असले तरी ऊस व इतर पिकांसाठी आवश्यक असा पाऊस न झाल्याने हुमनीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कळाशी, गंगावळण, पडस्थळ, माळवाडी, शिरसोडी, राजवडी, गलांडवाडी, कालठण आदी भागात हुमनीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे.

 

Back to top button