भात पिकात जुन्नर तालुक्याचा दबदबा; पीक स्पर्धांचे राज्यस्तरीय निकाल जाहीर | पुढारी

भात पिकात जुन्नर तालुक्याचा दबदबा; पीक स्पर्धांचे राज्यस्तरीय निकाल जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात हंगाम 2021 मध्ये घेण्यात आलेल्या पीक स्पर्धांचे राज्यस्तरीय निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. खरीप भात पिकात आदिवासी गटात पुणे जिल्ह्यातील पारगाव मढ (ता. जुन्नर) येथील इगणपत येसू घोडे यांनी हेक्टरी 115 क्विंटल उत्पादन घेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तळेरान (ता. जुन्नर) येथील मंजुळाबाई तान्हाजी कोंढावळे यांनी 111 क्विंटल उत्पादन घेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा येथील शेतकर्‍यांनी विविध पिकांमध्ये बाजी मारली आहे.

पीक स्पर्धा समितीचे अध्यक्ष आणि कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी हे निकाल जाहीर केले आहेत. खरीप मूग, उडीद, सोयाबीन, तूर, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, भुईमूग या पिकांच्या स्पर्धेत सर्वसाधारण गट आणि आदिवासी गटांमध्ये प्रत्येक पीकनिहाय आलेल्या पहिल्या तीन विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम पुरस्कार 50 हजार रुपये, द्वितीय 40 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 30 हजार रुपये असून, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लवकरच पुरस्कार वितरणाची तारीख निश्चित होईल, अशी माहिती कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी दिली. खरीप पिकांच्या प्राप्त उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकर्‍यांच्या गुणानुक्रमान्वये राज्यस्तरावरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवड करण्यात आली आहे.

असा आहे स्पर्धेचा निकाल
खरीप मूग – सर्वसाधारण गट :
विजय तात्यासो दवेकर, मु. पो. मोही, ता. माण, जि. सातारा – हेक्टरी उत्पादन 25 क्विंटल 46 किलो (द्वितीय), मनोहर शंकर देवकर, मु. पो. मोही, ता. माण, जि. सातारा-हेक्टरी उत्पादन 24 क्विंटल 24 किलो (तृतीय).
खरीप उडीद – सर्वसाधारण गट :
सुजाता शहाजी कमटकर, मु. पो. राजेवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर. हेक्टरी 30 क्विंटल 20 किलो, (तृतीय).
खरीप सोयाबीन – सर्वसाधारण गट :
सुरेश शंकरराव पाटील, मु. पो. उंडाळे, ता. कराड, जि. सातारा. हेक्टरी 79 क्विंटल (प्रथम).
शिवाजी विष्णू पाटील, मु. पो. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. हेक्टरी 74 क्विंटल 60 किलो (द्वितीय).
सुहास शंकर कदम, मु. पो. इंदोली, ता. कराड, जि. सातारा. हेक्टरी 73 क्विंटल (तृतीय).
खरीप भात- सर्वसाधारण गट:
साहेबराव मण्याबा चिकणे, मु. पो. सोनगाव, ता. जावली, जि. सातारा. हेक्टरी 154 क्विंटल 57 किलो (प्रथम).
खरीप भात – आदिवासी गट:
गणपत येसू घोडे, मु. पो. पारगाव मढ, ता. जुन्नर, जि. पुणे. हेक्टरी 115 क्विंटल (प्रथम).
मंजुळाबाई तान्हाजी कोंढावळे, मु. पो. तळेरान, ता. जुन्नर, जि. पुणे. हेक्टरी 111 क्विंटल (तृतीय).
खरीप ज्वारी- सर्वसाधारण गट:
तानाजी श्रीपती यादव, मु. पो. गमेवाडी-पाठरवाडी. ता. कराड, जि. सातारा. हेक्टरी 46 क्विंटल 28 किलो (प्रथम).
पांडुरंग आनंदा यादव, गमेवाडी-पाठरवाडी, ता. कराड, जि. सातारा. हेक्टरी 41 क्विंटल 50 किलो (द्वितीय).
संदीप रामचंद्र यादव, गमेवाडी-पाठरवाडी, ता. कराड, जि. सातारा हेक्टरी 39 क्विंटल 51 किलो (तृतीय).
खरीप बाजरी- सर्वसाधारण गट:
प्रकाश हणमंत गायकवाड, पिसाळवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा. हेक्टरी 100 क्विंटल 12 किलो (प्रथम).
छबन नारायण गायकवाड, भादे, ता. खंडाळा, जि. सातारा हेक्टरी 93 क्विंटल 35 किलो (द्वितीय).
दशरथ नामदेव गेंड, मनकर्णवाडी, ता. माण, जि. सातारा. हेक्टरी 92 क्विंटल 70 किलो. (तृतीय).
खरीप नाचणी- सर्वसाधारण गट :
निंगोजी बारकू कुंदेकर, शेवाळे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. हेक्टरी 72 क्विंटल 42 किलो (प्रथम).
सदानंद नरसू गावडे, नांदवडे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. हेक्टरी 52 क्विंटल 80 किलो (द्वितीय).
सुलभा सटुप्पा गिलबिले, नागणवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. हेक्टरी 51 क्विंटल 60 किलो (तृतीय).
खरीप भुईमूग- सर्वसाधारण गट:
नीलेश कमलाकर शिंदे, वाघवाडी, ता. वाळवा, जि. सांगली. हेक्टरी 72 क्विंटल 29 किलो (प्रथम) शंकर रामचंद्र कदम, इंदोली, ता. कराड, जि. सातारा. हेक्टरी 49 क्विंटल 36 किलो (द्वितीय). अधिक मारुती माने, मानेगाव, ता. पाटण, जि.सातारा. हेक्टरी 44 क्विंटल 83 किलो (तृतीय).

Back to top button