तळेगाव दाभाडे : तळेगावात चोख पोलिस बंदोबस्त | पुढारी

तळेगाव दाभाडे : तळेगावात चोख पोलिस बंदोबस्त

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून मागील दोन वर्ष गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावर्षी शासनाने सर्व निर्बंध हटविल्यामुळे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. तळेगाव शहर परिसरात एकूण 88 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन लांडगे यांनी दिली.

तळेगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवास लोकमान्य टिळकापासून स्थापनेची शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. येथील काही गणपती हे मानाचे आणि नवसाला पावणारे असल्याचे येथील भाविकांमध्ये भावना असल्यामुळे गणेशोत्सव काळात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते.

रस्त्यांची डागडुजीचे नियोजन
या गर्दीच्या नियोजनासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक दुर्गानाथ साळी, किरण पठारे, उपनिरीक्षक प्राजक्ता धापटे, शरद शिंपणे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचार्‍यांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी शहर स्वच्छता व औषध फवारणी व मिरवणुकीच्या रस्त्यांची डागडुजी आदीचे नियोजन केले आहे.

देखावे करण्यात कार्यकर्त्यांची लगबग
सध्या सर्व मंडळांचे कार्यकर्ते भव्य देखावे, आरास तसेच आकर्षक विजेची रोषणाई करण्यात गुंतले आहेत. गाव भागात 52, स्टेशन भागात 29 तर शहरालगत 9 गणेशोत्सव मंडळांची पोलिस ठाण्यात नोंद झाली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लांडगे यांनी सांगितले.

Back to top button