पुण्यात प्रथमच जंगल सफारीचा २डी ॲनिमेशन देखावा | पुढारी

पुण्यात प्रथमच जंगल सफारीचा २डी ॲनिमेशन देखावा

पुणे; ऑनलाईन डेस्क: पुण्यातील ५० वर्ष जुने अनोखे गणपती मंडळ म्हणून पेरुगेट चौक मित्र मंडळाची ओळख असून गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट कल्पनांमुळे गेल्या १२-१३ वर्षांपासून मंडळ प्रसिद्धीत आले आहे. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मंडळ १० दिवस स्लाइड शोद्वारे अनोखे सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम सादर करणार आहे.

दै पुढारीशी बोलताना योगेश पाटील म्हणाले की, या वर्षी आम्ही एक पाऊल पुढे टाकत गणेशोत्सवात प्रथमच २डी ॲनिमेशन जंगल सफारी सादर करत आहोत. डिजिटायझेशन आणि तांत्रिक सुधारणांच्या या युगात आम्ही असे प्रयत्न करत आहे. तीन मिनिटाचा हा देखावा असून लहान मुलांना आनंदाची पर्वणी असणार आहे. असा देखावा मनोरंजनाच्या नव्या जगाचा शोध घेताना पुण्याच्या गणेशोत्सवात हा एक मैलाचा दगड ठरेल याची आम्हाला खात्री आहे.

पेरुगेट चौक मित्र मंडळाने आतापर्यंत सादर केलेले स्लाइड शो

  • भारतातील दहशतवाद
  • शेजारी देशातील सामाजिक-राजकिय संबंध
  • जागतिक व्यापार केंद्रावर दहशतवादी हल्ले
  • कारगिल युद्ध
  • २६ जुलै २००५ चा पूर
  • अमरनाथ यात्रा
  • वाहतूक समस्या, प्रदूषण आणि त्याचे प्रतिबंध
  • स्त्रीभृण हत्या

 

Back to top button