राडारोडा टाकणार्‍यांकडून 85 हजारांचा दंड वसूल; कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई | पुढारी

राडारोडा टाकणार्‍यांकडून 85 हजारांचा दंड वसूल; कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या बावधन गावामध्ये गायरान परिसरात विनापरवाना रात्रीच्या वेळी राडारोडा टाकणार्‍या ट्रकधारकावर कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य अधिकार्‍यांनी कारवाई केली. यात त्याच्याकडून 85 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांनी दिली.

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा आणि घाण करणार्‍यांवर वचक बसविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सुगावा पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात आरोग्य निरीक्षक, मोकादम व तीन सेवकांची नेमणूक करण्यात आली.

बावधन येथील गायरानच्या जागेवर ट्रकमधून राडारोडा टाकला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य निरीक्षक हनुमंत चाकणकर, गणेश चोंधे, करण कुंभार, सचिन लोहकरे, मोकादम राम गायकवाड, वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे यांच्या पथकाने सापळा रचून सदर ट्रकला पकडून चालकास 85 हजारांचा दंड वसूल केला.

Back to top button