पुणे : पसंतीक्रमासाठी आज राहणार शेवटची संधी | पुढारी

पुणे : पसंतीक्रमासाठी आज राहणार शेवटची संधी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणार्‍या विशेष प्रवेश फेरीत पसंतीक्रम भरून अर्ज लॉक करण्यासाठी आज (दि. 2) सप्टेंबरपर्यंत शेवटची संधी आहे. येत्या 5 सप्टेंबरला विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून, प्रवेश जाहीर होणार्‍या विद्यार्थ्यांना 5 ते 8 सप्टेंबरदरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत सध्या अर्जातील भाग एक पूर्ण न केलेले 5 हजार 37 विद्यार्थी, पडताळणी बाकी असलेले 1 हजार 378 विद्यार्थी, तर अर्जाचा भाग दोन पूर्ण न भरलेले 51 हजार 409 विद्यार्थी आहेत.

त्यामुळे या सर्वांना प्रवेशाची शेवटची संधी म्हणून विशेष फेरीत सहभागी होता येणार आहे. याच पद्धतीने कोटांतर्गत विशेष फेरी आणि बायफोकलची प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. अकरावी प्रवेशासाठी यंदा तीन फेर्‍या झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विशेष फेरीसाठी 314 महाविद्यालयांमध्ये तब्बल 64 हजार 233 जागा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. तर, कॅपमधून 37 हजार 574 आणि कोटा प्रवेशातून 7 हजार 983 अशा एकूण 45 हजार 557 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button