पिंपरी : किरकोळ वादातून दुकानाची तोडफोड | पुढारी

पिंपरी : किरकोळ वादातून दुकानाची तोडफोड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दुकानासमोर लावलेली कार काढण्यास सांगितल्याच्या किरकोळ वादातून चौघांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच, दुकानाची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 31) सकाळी वाघेवस्ती, चाकण येथे घडली. रमेश गणपत पुरोहित (48, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रदीप सोमनाथ उटे (रा. नाशिक), गहिनीनाथ नारायण उटे (वय 71), गौतम गहिनीनाथ उटे (वय 30), हर्षल रामनाथ उटे (26, तिघे रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी प्रदीप याने त्याची कार फिर्यादी यांच्या दुकानासमोर पार्क केली होती. दरम्यान, फिर्यादी यांनी कार बाजूला घेण्यास सांगितले असता आरोपींनी त्यांच्या दुकानात घुसून मारहाण व शिवीगाळ केली. तसेच, आरोपी गौतम याने फिर्यादी यांच्या मानेवर लाकडी दांडक्याने व पाण्याच्या जारने मारहाण केली. त्यानंतर दुकानात तोडफोड करून 10 हजारांचे नुकसान केले. प्रदीप, गहिनीनाथ आणि गौतम या तिघांना अटक केली आहे.

Back to top button