पिंपरी : दिवसभरात आढळले कोरोनाचे 57 रुग्ण | पुढारी

पिंपरी : दिवसभरात आढळले कोरोनाचे 57 रुग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे गुरुवारी (दि. 1) दिवसभरात 57 बाधित रुग्ण आढळले. तर, 51 रुग्ण बरे झाले आहेत. गुरुवारी दिवसभरात 550 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली.

तर, 1 हजार 188 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. शहरात आज अखेर एकूण 3 लाख 70 हजार 47 बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3 लाख 65 हजार 687 रुग्ण बरे झाले. तर, 4 हजार 628 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Back to top button