पुणे : दहा हजार रुपयांची खंडणी मागून दोन हजार हिसकावले | पुढारी

पुणे : दहा हजार रुपयांची खंडणी मागून दोन हजार हिसकावले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हातगाडी व्यावसायिकाला शिवीगाळ करून महापालिकेच्या कारवाईचा धाक दाखवीत, प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करून दोन हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सराईत गुन्हेगार जितेंद्र भोसले (रा. विमाननगर) याच्यासह त्याच्या तीन ते चार साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका 21 वर्षीय हातगाडी चालकाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 26 ऑगस्ट रोजी घडला.

फिर्यादी हे विमानगर येथील सांबर हॉस्पिटल शेजारील गल्लीमध्ये पेरू व कच्ची दाबेली विक्रीची हातगाडी लावलात. 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास आरोपी भोसले हा त्याच्या साथीदारासमवेत तेथे आला होता. त्याने फिर्यादी व त्यांच्या कामगाराला शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर फिर्यादींकडून दोन हजार रुपये आरोपींनी काढून घेतले होते. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाठक करीत आहेत.

 

 

 

Back to top button