पुणे : सामूहिक सुर्यनमस्कारातून दगडूशेठ गणपतीला मानवंदना | पुढारी

पुणे : सामूहिक सुर्यनमस्कारातून दगडूशेठ गणपतीला मानवंदना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सूर्यनमस्कार हे सर्व सक्षम ताकदीचे द्योतक आहे यातून एक सज्ञान आणि सुसंस्कृत मनुष्य निर्मिती व्हावी यासाठी पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी 15 हजार सामूहिक सूर्यनमस्कार ने आज बाप्पाला वंदन केले. लक्ष्मी वेंकटेश एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट ,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,आणि इंस्टिट्यूट ऑफ योगा पुणे या तीन संस्थांच्या माध्यमातून आज सकाळी सूर्यनमस्काराच्या माध्यमातून शाळेतील मुलांनी वंदन केले. पुण्यातील 7 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्यापैकी 2 कर्णबधीर शाळा होत्या. 361 विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या 15 हजार सूर्यनमस्कार भगवंता समोर वंदन केले .या उपक्रमाचे हे 9 वे वर्ष आहे.

Back to top button