पिंपरी : वाल्हेकरवाडी परिसरात विजेचा खोळंबा | पुढारी

पिंपरी : वाल्हेकरवाडी परिसरात विजेचा खोळंबा

पिंपरी : वाल्हेकरवाडी येथील गुरूद्वारा चौक परिसरात दुपारपासून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच नागरिकांना श्री गणेशाचे आगमन उत्सव अंधारात साजरा करावा लागला.
येथील आकुर्डी रेल्वे स्टेशन, गुरूद्वारा, चिंचवडगाव, राजयोग कॉलनी व बिजलीनगर आदी परिसरातील वीजपुरवठा दुपारी चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत खंडित झाला होता.

खंडित वीजपुरवठ्यामुळे गणेश आगमनाच्या आनंदाच्या वातावरणात विरजण पडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. केबलमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता यांनी दिली.

Back to top button