पुणे : दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज | पुढारी

पुणे : दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली असून, शहरात 34 बांधीव हौद आणि 388 पाण्याच्या लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली आहे. यासोबतच मूर्ती दान व मूर्तीसंकलन केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आल्याचे घनकचरा विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी सांगितले आहे. जल्लोषपूर्ण व उत्साही वातावरणात लाडक्या बाप्पाचे बुधवारी आगमण झाल्यानंतर आज (गुरुवार) दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे.

बाप्पाचे विसर्जन आणि संपूर्ण गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा होण्यासाठी प्रशासनाने विविध पातळ्यांवर तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिकेने शहरात 34 बांधीव हौद आणि 388 पाण्याच्या लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली आहे. तसेच विसर्जनाच्या सर्व ठिकाणी मूर्ती दान केंद्र, मूर्ती संकलन केंद्र आणि निर्माल्य संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे. या केंद्रांची क्षेत्रीय कार्यालय निहाय माहिती व यादी महापालिकेने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. कोणीही बाप्पाची मूर्ती व निर्माल्य नदीपात्र, तलावात व इतर जलस्त्रोतांमध्ये टाकू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय गणेश विसर्जन हौदांची व लोखंडी टाक्यांची संख्या
(यामध्ये समाविष्ट गावांमधील विसर्जन व्यवस्थेचाही समावेश आहे.)
क्षेत्रीय कार्यालय बांधिव हौद लोखंडी टाक्या
1) नगर रस्ता-वडगाव शेरी 01 12
2) येरवडा-कळस-धानोरी 02 14
3) ढोले पाटील 03 01
4) औध-बाणेर 00 27
5) शिवाजीनगर घोले रस्ता 00 17
6) कोथरूड-बावधन 00 31
7) धनकवडी-सहकारनगर 10 41
8) सिंहगड रस्ता 02 20
9) वारजे-कर्वेनगर 03 57
10) हडपसर मुंढवा 01 35
11) वानवडी-रामटेकडी 02 07
12) कोढवा-येवलेवाडी 06 29
13) कसबा-विश्रामबागवाडा 00 43
14) भवानी पेठ 02 02
15) बिबवेवाडी 02 52
एकूण 34 388

Back to top button