चाकण : मान खाजवणे पडले पावणेतीन लाखांना

चाकण : मान खाजवणे पडले पावणेतीन लाखांना

चाकण : पुढारी वृत्तसेवा : मानेला खाजवणे एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल पावणेतीन लाख रुपयांना पडले. अवघ्या काही सेकंदांत त्यांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी पळवली. ही घटना सोमवारी (दि. 29) दुपारी चाकण येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर घडली, शांताराम रंगनाथ शितोळे (वय 65, रा. देशमुखवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी शितोळे दोन लाख 75 हजार रुपये रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या चाकण शाखेसमोर थांबले होते. त्यावेळी त्यांच्या मानेला खाज सुटली, म्हणून त्यांनी रोकड असलेली पिशवी खाली ठेवली. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांची रोकड असलेली पिशवी चोरून नेली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news