पुणे : देखावे पाहण्यासाठी असणार एकेरी मार्ग | पुढारी

पुणे : देखावे पाहण्यासाठी असणार एकेरी मार्ग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आजपासून गणेशोत्सवास सुरुवात होत असून, त्या पार्श्वभूमीवर शहरात गणपती पाहण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी पाहता पादचार्‍यांसाठी देखील पोलिसांनी नियोजन केले आहे. शहरात ठिक-ठिकाणी श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात देखावे व रोषणाई करण्यात आलेली आहे. सदरची रोषणाई व देखावे पाहण्यासाठी शहरातील व शहराबाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात, त्यामुळे रहदारीचा ताण वाढतो.

वाहतुकीची काही प्रमाणात कोंडी तसेच वाहतूक संथ होते. ही कोंडी व गैरसोय टाळणेसाठी त्याचप्रमाणे नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी अत्यावश्यक वाहने वगळता 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर गर्दी संपेपर्यंत पादचा-यांकरिता एकेरी व दुहेरी मार्ग करण्यात आले आहेत.

पादचारी एकेरी मार्ग
जिजामाता चौक ते रामेश्वर चौक (फक्त जाण्याकरिता रामेश्वर चौकाकडून येण्यास बंदी) बेलबाग चौक ते बाबू गेणू गणेश मंडळ (फक्त जाण्याकरिता बाबू गेणू गणेश मंडळाकडून येण्यास बंदी) बेलबाग चौक ते गणपती चौक (फक्त जाण्याकरिता गणपती चौकाकडून बेलबाग चौकाकडे येण्यास बंदी) गणपती चौक ते तुळशीबाग गणपती ते काका हलवाई चौक ते बाबू गेणू गणेश मंडळ (काका हलवाई चौकाकडून तुळशीबाग गणपतीकडे येण्यास बंदी) तुळशीबाग गणपती ते जिलब्या मारुती गणपती चौक (जिलब्या मारुती गणपती चौकाकडून तुळशीबाग गणपतीकडे येण्यास बंदी) दत्तमंदिर ते क्रांती हॉटेल (क्रांती हॉटेलकडून दत्तमंदिरकडे येण्यास बंदी)

पादचारी दुहेरी मार्ग
पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक आप्पा बळवंत चौक ते मोती चौक फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज ते गाडगीळ पुतळा चौक फडके हौद चौक ते मोती चौक ते सोन्यामारुती चौक ते शुक्रवारपेठ पोलिस चौकी ते रामेश्वर चौक रामेश्वर चौक ते शनिपार चौकावरील पादचारी एकेरी मार्ग हे बदल फक्त गणपती उत्सव कालावधी पुरते दि. 1 सप्टेंबरपासून गर्दी संपेपर्यंत राहतील.

Back to top button