पुणे : पार्किंग व्यवस्थेत होणार बदल; पाचव्या, सातव्या, नवव्या दिवशी गर्दी टाळण्याचे आवाहन | पुढारी

पुणे : पार्किंग व्यवस्थेत होणार बदल; पाचव्या, सातव्या, नवव्या दिवशी गर्दी टाळण्याचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात गणेशोत्सवाच्या पाचव्या (दि. 4), सातव्या (दि. 6), नवव्या दिवशी (दि. 8) होणार्‍या गणेश विसर्जन ठिकाणांजवळ गर्दी होऊ नये, यासाठी पार्किंग व्यवस्थेबाबत वाहतूक पोलिसांनी सूचना केल्या आहेत. त्याचे पालन करण्याचे आवाहनही नागरिकांनी केले आहे.

अप्सरा टॉकीजजवळील कॅनॉल (पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता) :
8 पार्किंग पंडित नेहरू रस्त्यावर वाहने अप्सरा टॉकीजचे बाजूस पार्क करावीत.

चिमाजी आप्पा पेशवे पथावरील सावरकर पुतळ्याजवळील कॅनॉल (मित्रमंडळ – सावरकर चौक दरम्यान).
8 पार्किंग- चिमाजी आप्पा पेशवे पथावर कॅनॉलचे पुढे मित्रमंडळ चौकापर्यंत पाटील प्लाझाचे डावे बाजूस तसेच सावरकर पुतळा चौकापासून ते पेशवे पार्क या सिंहगड रोडवर सारसबागेचे बाजूस पार्क करावीत.

संगमपूल घाट (आर.टी.ओ.जवळ मोतीलाल रस्त्यावर) :
8 पार्किंग- संगम पूल येथील राजाबहादूर मिल रोडवर जुने सी.आय.डी. कार्यालय ते आर.टी.ओ. चौक येथे दोन्ही बाजूस भिंतीस लागून पार्क करावीत. तसेच एस.एस.पी.एम.एस. ग्राउंडचे बाजूसही वाहने पार्क करावीत.

एस. एम. जोशी पुलाखाली (गरवारे कॉलेज मागे)
8 पार्किंग – एस. एम. जोशी पुलाजवळ गरवारे कॉलेजच्या मागील बाजूस व ठोसर बागेसमोरील स्टेट बँक (वैकुंठ स्मशानभूमी रोड)
बाबा भिडे पूल : दोन्ही बाजूस (डेक्कन पीएमपीएमएल बसस्टॉपजवळ).

8 पार्किंग- बाबा भिडे पूल दोन्ही बाजूस नदी पात्रातील मोकळी जागा.
गणेश विसर्जनाच्या पाचव्या, सातव्या व नवव्या दिवशी श्रींची मूर्ती वाहनांवरून उतरून घेतल्यानंतर तत्काळ सदर ठिकाणाहून वाहन हलवून ते वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी रस्ता सोडून अन्य ठिकाणी पार्क करावी, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

Back to top button