पुणे : वरकुटे बुद्रुक चौकात हायमास्ट, सीसीटीव्हीची मागणी | पुढारी

पुणे : वरकुटे बुद्रुक चौकात हायमास्ट, सीसीटीव्हीची मागणी

वरकुटे बुद्रुक, पुढारी वृत्तसेवा : नुकतीच गोळीबार करत कोट्यवधीची रक्कम लुटल्याची घटना आणि चौकात वारंवार होत असलेले गुन्हे व अपघातांमुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथील चौकात हायमास्ट दिवे व सीसीटीव्ही बसवण्याची मागणी होत आहे.

चौकातील सर्व दुकाने रात्री 8 च्या सुमारास बंद होतात, त्यामुळे चौक अंधारमय होतो. अंधाराचा फायदा घेत चौकात याअगोदरही चोरी, गाड्या अडविण्यासारखे प्रकार घडले आहेत. हाय मास्ट दिवे बसवल्यास चौक कायम प्रकाशमान राहून प्रवाशांसह स्थानिकांना फायदा होणार आहे.

उजेड असल्याने वाहनचालकांना चौकातील परिस्थिती दुरूनच लक्षात येऊन चालक वेळीच सावध होऊन दुर्घटना टाळता येतील. एमआयडीसीत रात्री महिला कर्मचारी शिफ्ट संपल्यानंतर घराकडे येतात. त्यांनाही चौकातील लाईटचा फायदा होणार आहे. त्यामुळे या चौकात हायमास्ट दिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत आहे.

Back to top button