पिंपरी : दुचाकीची दुभाजकाला धडक; दोन जणांचा मृत्यू | पुढारी

पिंपरी : दुचाकीची दुभाजकाला धडक; दोन जणांचा मृत्यू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दुभाजकाला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 28) मध्यरात्री नाशिक फाटा येथे घडली. विकास वर्मा (30, पिंपळे गुरव), धीरज पवार अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रकाश दादासाहेब कदम (27, रा. रहाटणी. मूळ रा. देवगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र विकास आणि धीरज असे दुचाकीवरून नाशिक फाटा येथून भोसरीकडे जात होते. त्यावेळी दुभाजकाला दुचाकी धडकून अपघात झाला. यामध्ये धीरज आणि विकास यांना गंभीर दुखापत झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. विकास याने दुचाकी चालवताना केलेल्या हयगयीमुळे हा अपघात झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button