लोहगाव-वाघोली रोडवर तुंबले ड्रेनेजचे पाणी

लोहगाव-वाघोली या मुख्य रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोहगाव-वाघोली या मुख्य रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Published on
Updated on

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: लोहगाव- वाघोली रस्त्यावरील दादाची वस्ती, कर्मभूमीनगर जवळ ड्रेनेजचे पाणी मुख्य रस्त्यावर तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी पावसाचे पाणी तुंबून राहिल्याने एका तरुणाचा बळी गेला होता. आता या ठिकाणी पाऊस पडल्यास पुन्हा 'जैसे थे' अशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. दादाची वस्ती या ठिकाणी मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाइनचे काम सुरू आहे.

मात्र, ड्रेनेजचा मैलापाणी रस्त्यावर चर खोदून तात्पुरती वाट करून सोडून देण्यात आला होता. मात्र, आता तो बंद केल्याने मैलापाणी रस्त्यावर साचून राहिला आहे. याच पाण्यातून नागरिक ये-जा करीत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने लवकर कार्यवाही न केल्यास गणपतीच्या मिरवणुका याच पाण्यातून काढण्याची नामुष्की येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news