पुणे : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

पुणे : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात टेम्पोच्या धडकेने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.28) दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. संजय विठ्ठल कालेकर (वय 45, रा. दत्तवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कालेकर यांच्या पत्नी सविता यांनी फिर्याद दिली आहे. कालेकर पानमळा परिसरातून दुपारी जात होते. त्या वेळी भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला.

Back to top button