पुणे : मुले गेली नातेवाइकांकडे अन् पोलिसांनी धुंडाळले शहर | पुढारी

पुणे : मुले गेली नातेवाइकांकडे अन् पोलिसांनी धुंडाळले शहर

पुणे : घरातून बेपत्ता झालेली मुले नातेवाइकांकडे सापडली. अपहरणाचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संपूर्ण शहर धुंडाळून मुलांचा शोध घेतला. शेवटी मुले विश्रांतवाडी येथील नातेवाइकांकडे असल्याची माहिती मिळाली आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

रविवारी सकाळी दोघे सख्खे भाऊ आत्याच्या धनकवडी येथील घरातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दुपारी ही मुले विश्रांतवाडी येथील एका नातेवाइकांच्या घरी असल्याचे समजले. त्यानुसार त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पालकांकडे दिले.

Back to top button