पिंपरी-चिंचवड लिंक रोडवरील गोडाऊनमुळे वाहतुकीचा खोळंबा

पिंपरी-चिंचवड लिंक रोडवरील गोडाऊनमुळे वाहतुकीचा खोळंबा

पिंपरी : पिंपरी रेल्वे उड्डाण पुलाकडून चिंचवड गावाकडे जाणार्‍या लिंक रोडवर असलेल्या गोडाऊनमुळे मोठी वाहने तेथे आडवी उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. पिंपरी रेल्वे उड्डाणपुलाकडून चिंचवड गावाकडे जाणारा हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावर अनेक व्यापार्‍यांची गोडाऊन आहेत.

मोठ-मोठे ट्रेलर आणि ट्रक विविध प्रकारचा माल घेऊन येतात. हे ट्रक आडवे तिडवे उभे राहत माल खाली करत असल्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा येतो. महापालिका व वाहतूक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. एक तर या ठिकाणी अशा अतिजड वाहनांना प्रवेश बंदी करावी किंवा येथील गोडाऊन दुसरीकडे हलविण्यासाठी व्यापार्‍यांना प्रवृत्त करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news