कांबळेश्वरला घरफोडीत पावणेदोन लाखांचा ऐवज चोरीस | पुढारी

कांबळेश्वरला घरफोडीत पावणेदोन लाखांचा ऐवज चोरीस

बारामती; पुढारी वृत्तसेवा: कांबळेश्वर (ता. बारामती) येथे चोरट्यांनी घरफोडी करत 1 लाख 68 हजारांचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा 1 लाख 78 हजार रुपयांचा माल लंपास केला. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात आनंदराव कोंडीबा कदम (रा. बारवनगर, कांबळेश्वर) यांनी फिर्याद दिली. शनिवारी (दि. 27) सकाळी ही घटना उघडकीस आली.

फिर्यादीचा मुलगा व सून पुण्यामध्ये राहतात. मुलाची बेडरुम त्यांच्या राहत्या घरासमोर आहे. ती बंद असते. दि. 26 रोजी फिर्यादी हे पत्नीसह जेवणखाण करून झोपी गेले. दि. 27 रोजी सकाळी मुलाची बेडरुम उघडी असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी शेजार्‍यांना हाका मारून बोलावून घेतले. बेडरुममध्ये जात पाहणी केली असता घरातील लाकडी कपाट उघडे दिसले. त्यातील कपडे व इतर वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या.

किशोर यांना फिर्यादीने याची कल्पना दिली. दि. 27 रोजी सकाळी दहाच्या सुमारास मुलगा व सून पुण्यातून कांबळेश्वरला आले. त्यांनी घराची पाहणी केली असता कपाटातील तीन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची साखळी, रिंग, पैंजण, चांदीचा ग्लास, करंडा असे 1 लाख 68 हजार रुपयांचे दागिने व रोख 10 हजार रुपयांची रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Back to top button