पिंपरी : डाळिंब, सीताफळ, पेरूच्या दरात वाढ | पुढारी

पिंपरी : डाळिंब, सीताफळ, पेरूच्या दरात वाढ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरीतील फळबाजारात डाळिंब, सीताफळ आणि पेरूच्या दरात 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशी फळांच्या बरोबरीनेच विदेशी फळेही विकली जात आहेत. देशी फळांच्या तुलनेत विदेशी फळांचे भाव जवळपास दुपटीपेक्षा अधिक आहेत. तरीही त्यांना ठराविक वर्गाकडून मागणी मिळत आहे. गणेशोत्सव आणि गौरी पूजन असल्याने पिंपरीतील फळबाजारात सध्या विविध फळांची मागणी वाढली आहे. त्यानुसार फळांची आवकही वाढली आहे.

सफरचंदाचे दर सध्या स्थिर आहेत. सफरचंद 80 ते 200 रुपये किलो या दराने विकले जात आहेत. डाळिंबचे दर सध्या 80 ते 200 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यात डाळिंबचा दर 70 ते 150 रुपये किलो इतका होता. मागील आठवड्यात पेरु 60 रुपये किलोने मिळत होते. त्याचा आता भाव 100 रुपयांपर्यंत गेला आहे. तसेच, मागील आठवड्यात सीताफळ प्रति किलो 50-150 रुपयांनी मिळत होते ते आता 50 ते 200 रुपये दराने मिळत आहे.

चिकूच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात चिकूचा दर 120 रुपये प्रति किलो असा होता. तर, रविवारी 100 ते 150 रुपये प्रति किलो असा भाव चिकूला मिळाला. येत्या दोनच दिवसात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. उत्सव काळात फळांना चांगली मागणी असते. पुढील दोन दिवसांत फळांची आवक आणखी वाढेल, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

देशी फळांचे प्रति किलो दर
सफरचंद 80 ते 200
डाळिंब 80 ते 200
पेरू 50 ते 100
सिताफळ 50 ते 200
सिट्रस संत्री 200
मोसंबी 70 ते 100
चिकू 100 ते 150
भारतीय ड्रॅगन फ्रुट (पांढरा) 160
भारतीय ड्रॅगन फ्रुट (तांबडा) 200
विदेशी फळांचे प्रति किलो दर
अ‍ॅप्रीकोट (केनिया) 500
रॉयल गाला सफरचंद (न्यूझीलंड) 230
रोझ सफरचंद (न्युझीलंड) 300
ग्रीन सफरचंद (ऑस्ट्रेलिया) 300
वॉशिंग्टन सफरचंद 250
द्राक्षे (कॅलिफोर्निया) 400
द्राक्षे (जपान) 500
पिअर (साऊथ आफि—का) 180
जपान ड्रॅगन फ्रुट (तांबडा) 250
जपान ड्रॅगन फ्रुट (पांढरा) 200

Back to top button