हिवरे येथे जमिनीच्या ताब्यासाठी मारहाण

हिवरे येथे जमिनीच्या ताब्यासाठी मारहाण
Published on
Updated on

सासवड : पुरंदर तालुक्यातील हिवरे येथे जमिनीच्या ताब्यासाठी पुतण्याने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. दिनकर नामदेव दळवी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे, त्यावरून अशोक बबन दळवी, वैशाली अशोक दळवी, सुमन बबन दळवी (तिघे राहणार हिवरे- रामवाडी) व अनुराधा रामचंद्र कामठे (रा. चिंबळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वडिलोपार्जित सामाईक गटातील जमिनीवरून हा वाद झाला आहे. दिनकर यांचा पुतण्या अशोक बरोबर जमीन वाटपाचा वाद चालू आहे. 25 ऑगस्टला हिवरे, रामवाडी (ता. पुरंदर) येथे राहत्या घरासमोर अशोक बबन दळवी याने विनाकारण मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली होती. त्याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यावर अशोक यास पोलिसांनी समज दिली होती.

त्यामुळे फिर्यादी घरी परतले, परंतु फिर्यादीच्या शेतात घराचे बांधकाम सुरू असताना संबंधित आरोपीचे कुटुंब आले. फिर्यादीच्या हिश्श्याच्या जमिनीतील गाजर पिकात ट्रॅक्टर घालून 20 फुटांपर्यंत पिकासकट शेत नांगरून नुकसान केले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार प्रमोद भोसले व पोलिस नाईक विजय जावळे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news