वाकड येथे कुटुंबाला मारहाण | पुढारी

वाकड येथे कुटुंबाला मारहाण

पिंपरी : वाकड येथील टेलिफोन एक्सचेंज ऑफिसच्या पाठीमागे राहत असलेल्या कुटुंबाला क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (26 रोजी) घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला फिर्यादी वय (55) आणि त्यांचा पती, मुलगी व मुलगा यांस आरोपींकडून मारहाण करण्यात आली असून, आरोपी विशाल नाना शिंदे (वय 30), मोहन नाना शिंदे, (वय 40), दादा नाना शिंदे (वय 45), चेतन तात्या शिंदे, (वय 18), विशाल दादा शिंदे, विशाल सावंत, गणेश सावंत, (वय 40), सौरभ जगताप, (वय 40), प्रेम नाना शिंदे (वय 40), चार महिला आरोपी (वय 40) यांच्या विरोधात महिला फिर्यादीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात कोयता मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्नही झाला आहे. पोलिसांनी आरोपींवर कलम 452, 354अ,307,323,504 यानुसार मारहाण व जिवे मारण्याचा प्रयत्न अशा गुन्ह्यांची नोंद केली आहे.

Back to top button