खडकी : ऑनलाइन टेंडरमध्ये चुका; कर्मचारी निलंबित | पुढारी

खडकी : ऑनलाइन टेंडरमध्ये चुका; कर्मचारी निलंबित

खडकी; पुढारी वृत्तसेवा: खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ऑनलाइन टेंडर प्रक्रियेत चुका केल्याच्या कारणावरून बोर्डांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी एका कर्मचार्‍याला निलंबित केले आहे. बापू भालेराव असे कर्मचार्‍याचे नाव आहे. बोर्डाच्या आरोग्य विभागाच्या वतीने ऑनलाइन टेंडर प्रक्रिया काढण्याचे काम सुरू होते.

ऑनलाइन टेंडरसाठी बोर्डाचे सीईओ रॉबिन बलेचा यांनी कर्मचारी बापू भालेराव याला काही सूचना केल्या होत्या. मात्र, भालेराव याने सीईओच्या सूचना पायदळी तुडवीत टेंडरमध्ये काही घोळ केला. टेंडरमध्ये सीईओ यांचे आदेश धुडकावीत भालेराव यांनी घातलेले घोळ कोणाच्या फायद्यासाठी होते, हेही तपासले जाणार आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने टेंडर काढण्यात येत आहे. टेंडरसाठी बापू भालेराव यांनी चूक केल्याचे सीईओ यांना निदर्शनास आले आहे. सीईओ यांनी तडकाफडकी भालेराव यांना निलंबित केले असून, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.

                                                                        शिरीष पत्की, आरोग्य निरीक्षक

Back to top button