कात्रज घाट वनक्षेत्रात बिबट्याचे वास्तव्य; वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ | पुढारी

कात्रज घाट वनक्षेत्रात बिबट्याचे वास्तव्य; वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ

कात्रज; पुढारी वृत्तसेवा: कात्रज घाट परिसरातील भिलारेवाडी वनविभागात गेल्या पंधरा दिवसांत चार वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने यावेळी बिबट्याचा मुक्काम वाढल्याचे दिसत आहे. परिणामी, घाट रस्त्याने प्रवास करणारे दुचाकीस्वार व लगतच्या नागरी वस्तीतील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

भिलारेवाडी वन विभाग 750 हेक्टर क्षेत्रावर विभागाला आहे. उंच डोंगर, विस्तीर्ण झाडी, पाझर तलाव यामुळे वन्यजीवांचा अधिवास आहे. मोर, माकड, रान डुक्कर, ससे अशा वन्यजीवांसह बिबट्याचे वास्तव्य आढळून येते. अनेक वेळा बिबटे व बछडे पाहायला मिळाले आहेत. वन विभागालगत भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी भागात नागरी वस्ती झपाट्याने वाढली आहे, तसेच अनेक शेतकरी, शेतमजूर व नागरिकांची या भागात भटकंती असते. यापूर्वी गाई, वासरे व पाळीव कुत्र्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे.  भिलारेवाडी वनक्षेत्र मोठे असून, वन विभागातील वरिष्ठांचे नेहमीच दुर्लक्ष होते. बिबट्यावर लक्ष ठेवून खासगी जागेत दिसताक्षणी जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांतून वारंवार होत आहे. या संदर्भात रेंजर फॉरेस्ट ऑफिसर सणस यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

 

Back to top button